महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेची विशेष गाड्यांची मोठी व्यवस्था
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईकडे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. ४ ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे गाड्यांची मोठी व्यवस्था करण्यात आली असून विदर्भातील प्रवाशांसाठी ही महत्त्वाची दिलासा देणारी घोषणा आहे.
हे पण वाचा रेल्वेच्या तीन खेळाडूंना गट ‘ब’ पदोन्नती
अमरावती, बडनेरा आणि नागपूर मार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या १५ अनारक्षित विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. वाढत्या गर्दीमुळे दूरदूरच्या भागातून येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होऊ नये, प्रवास सुरळीत व सुरक्षित व्हावा, यासाठी हे नियोजन करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.


