‘महाभारत’मध्ये इंद्रदेवाची भूमिका साकारणारे अभिनेते सतीश कौल यांचे निधन

0
85
अभिनेते सतीश कौल

‘महाभारत’मध्ये इंद्रदेवाची भूमिका साकारणारे अभिनेते सतीश कौल यांचे निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते.त्यांच्या निधनाची माहिती अभिनेते गजेंद्र चौहान यांनी दिली. 300 हून अधिक पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.

पाच दिवसांपूर्वी त्यांना ताप आला होता. मात्र त्यांनी कोविड 19 ची चाचणी करुन घेण्यास नकार दिला होता. त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांच्या केअर टेकरने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात त्यांची कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली. पण रुग्णालयात त्यांची प्रकृती स्थिर होती.

औषधं, भाजी आणि काही मुलभूत गोष्टींसाठी मी झगडत आहे. मला मदत करा असे मी चित्रपटसृष्टीला आवाहन करतोय. अभिनेता असताना माझ्यावर इतक्या जणांनी प्रेम केले. पण आता मला एक माणूस म्हणून मदतीची गरज आहे . लॉकडाऊनमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचे त्यांनी सांगितले होते. अशी व्यथा निधनाच्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी मांडली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here