कोरोनापासून बचाव करण्यासाठी देशभरासह राज्यभरात वेगाने लसीकरण सुरू आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. आज राज्याने त्यात विक्रमी नोंद केली. आतापर्यंत सुमारे 1 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 1 कोटी 38 हजार 421 जणांना लस देण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत या आकडेवारीत अजून वाढ होणार असल्याची माहिती असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून यंत्रणेचे कौतुक करण्यात आले आहे.