महाराष्ट्रात 2 ते 3 आठवड्यांच्या आत तिसरी लाट येण्याचा अंदाज-AIIMS डॉ. गुलेरिया इशारा

0
93

महाराष्ट्रात 1-2 महिन्यांच्या आत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ही लाट कोरोनाचा खतरनाक व्हेरिएंट डेल्टा प्लस (AY.1) मुळे येईल. राज्याच्या कोविड टास्क फोर्सने बुधवारी या महामारीच्या आढावा बैठकीमध्ये ही माहिती दिली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेडिकल टीम आणि इतर अधिकाऱ्यांना आवश्यक उपकरणांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) चे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर कोरोना गाइडलाइंसचे पालन केले नाही आणि बाजार किंवा पर्यटनस्थळांवरील गर्दी थांबवली नाही तर कोरोनाची तिसरी लाट केवळ 6-8 आठवड्यांमध्ये संपूर्ण देशावर अटॅक करु शकते.देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही तिसऱ्या लाटेचा धोका टळलेला नाही. येत्या सहा आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची धक्कादायक माहिती एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी दिली.

 “आपण अनलॉक करत असताना पुन्हा एकदा लोकांकडून कोरोनासंबंधित सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून आपण धडा घेतलेला दिसत नाही. पुन्हा एकदा गर्दी होत आहे, लोक एकत्र येत आहेत. राष्ट्रीय स्तरावर रुग्णसंख्या वाढण्यास काही वेळ लागेल. पण तिसरी लाट अपरिहार्य असून पुढील सहा ते आठ आठवड्यात येऊ शकते…जास्त काळही लागू शकतो,” असं यावेळी रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.

तिसरी लाट रोखण्याचे 4 उपाय

  1. भारतातील जास्तीत जास्त लोकसंख्येचे लसीकरण करावे लागेल.
  2. लोकांना कोविड गाइडलाइन्सचे पालन करावे लागेल.
  3. अशा परीसरांची मॉनिटरिंग करावे लागेल, जेथे कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.
  4. जेथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 5% पेक्षा जास्त आहे, तेथे कंटेनमेंट क्षेत्र घोषित करावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here