महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता; मुख्यमंत्री उद्धव ठाकरें

0
86

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांचे संक्रमण रोखण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यात सर्वांची मते जाणून घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यींनी महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन होण्याचे संकेत दिले आहेत.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरु झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अशा अनेक नेत्यांची उपस्थिती होती.’कोरोना लसीचा दुसरा डोस देऊनही लोक पॉझिटिव्ह होत आहेत. हा मुद्दा पंतप्रधान मोदींसमोर मांडला होता.

सध्या कोरोनाची साखळी तोडणं आणि आरोग्य सुविधा वाढवणं गरजेचं आहे. लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यायचा झाल्यास तो एकमताने घेतला गेला पाहिजे. कालच निर्णय झाला असता पण देवेंद्रजी आपण नव्हता म्हणून आजची ही बैठक बोलावली आहे. लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. पण एकमत झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही, असे मत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडले आहे.

लॉकडाऊनबाबत तज्ज्ञांचे मत घेण्यात आले, त्यांनी 14 दिवसांचे लॉकडाऊन असावे मत व्यक्त केले आहे. लॉकडाऊनबाबत अनेक चांगल्या सूचना आल्या आहेत, मी त्याची नोंद घेतली आहे. कडक निर्बंध हवेत आणि सूटही पाहिजे हे दोन्ही गोष्ट एकत्र शक्य नाही. आता तरी आपल्याला कडक निर्बंध करुन थोडी कळ सोसावी लागेल. मी व्यापऱ्यांशी बोललो. होम डिलिव्हरी, टेक अवेला दोन तीन दिवस लागतील. सुरुवातीला 8 दिवस कडक निर्बंध लावू.

कोरोना हा रोगच नाही असा गैरसमज पसरवला जात आहे. पण, अशा लोकांची चर्चा करायला नको. सध्या कोरोनाचा गुणाकार थांबवला पाहिजे. किती आरोग्य सुविधा वाढवू शकू याचा विचार झाला पाहिजे. दोन डोस घेऊन सुद्धा अजून माझ्या शरिरात अँटी बॉडी तयार झाल्या नाहीत, यावरुन हा आजार किती भयंकर आहे, हे समजते असेही ते म्हणाले.यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोरोना रुग्ण वाढत आहेत, यासाठी निर्बंध असायला हवे.

पण, कडक लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल. आपण, जनतेचा उद्रेक लक्षात घेतला पाहिजे.’राज्यात कटू निर्णयाची अंमलबजावणी केली तर कोरोनाची साखळी तुटेल, असे मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, गुजरातमधून रेमडेसिव्हीरचा साठा मिळू शकला तर पाहावा. देवेंद्र फडणवीसही या बैठकीला उपस्थित आहेत..

3People Reached0EngagementsBoost PostLikeCommentShare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here