महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १ लाख पीपीई किटचा पुरवठा

0
119

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कळसुली प्रा.आ. केंद्रात पीपीई किट वाटपाचा शुभारंभ

      मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य विभागासाठी  १ लाख पीपीई किटचा पुरवठा केला आहे.  कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या  उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते आज कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात पीपीई किट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. कळसुली प्रा. आ. केंद्रासाठी  यातील २ हजार पीपीई किट देण्यात आली आहेत.  यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामपंचायतींना पीपीई किटचा मुबलक प्रमाणात पुरवठा होणार आहे. 

  यावेळी आ.वैभव नाईक म्हणाले, कोविडच्या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली  महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्याच्या  सोयी सुविधा पुरविल्या जात आहेत. जिल्ह्यासाठी आरटीपीसीआर लॅब उभारण्यात आली,  ऑक्सिजन बेड वाढविण्यात आले. जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित  करण्यात आले आहेत.  डॉकटर उपलब्ध करण्यात आले. शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कोविड  रुग्णसंख्या नियंत्रणात आणताना आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट महत्वाची बाब बनली आहे. जिल्ह्यात पीपीई किटची कमतरता भासता नये यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी  तब्बल १ लाख पीपीई किटचा पुरवठा केला असल्याचे आ. वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले. 

       याप्रसंगी कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपतालुकाप्रमुख राजू राणे, भास्कर राणे,कळसुली विभागप्रमुख रुपेश आमडोस्कर,युवासेना जिल्हा समन्वयक राजू राठोड, अतुल दळवी, सरपंच साक्षी परब,सुशांत दळवी, चंदू परब, सहदेव नाईक, मारुती सावंत, ललित घाडीगावकर, कळसुली प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता भडंगे, सुपरवायझर रजनी परब, आरोग्य सहाय्यक महादेव चव्हाण आदीसह शिवसैनिक  उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here