महाराष्ट्र शासनाचा मानाचा समजला जाणारा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार सन २०१७ -१८ वितरण सोहळा मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

0
89

वेंगुर्ला । अजय गडेकर
महाराष्ट्र शासनाचा मानाचा समजला जाणारा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१७-१८ वितरण सोहळा मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाडा ग्रामपंचायतीला मानाचा असा तृतीय क्रमांक,रोख १५,००,००० रुपये, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह या स्वरूपात प्राप्त झाला.

सदर सोहळ्याचे वितरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी यांनी या पुरस्काराचे ऑनलाईन वितरण केले. या सोहळ्यास अतिरिक्त जिल्हाधिकारी साठे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर, वेंगुर्ल सभापती अनुश्री कांबळी, गटविकास अधिकारी उमा पाटील, जिल्हा स्वच्छता अधिकारी मनीष पडते, किनळेकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी कुशेवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्यात ग्रामपंचायत कार्यकारिणी, कर्मचारी, उपस्थित ग्रामस्थांनी या पुरस्कारासाठी परिश्रम घेणारे तत्कालीन ग्रामसेवक कै. प्रसाद तुळसकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पुरस्कार स्वीकारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here