महिला वसतीगृहासाठी भाडेतत्वावर चालविण्यात प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

0
59

सिंधुदुर्ग: राज्यातील लोकसंख्या व नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृहाची मागणी लक्षात घेता मुंबई उपनगर जिल्हा- 6 मुंबई शहर, ठाणे, पुणे या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 4 व राज्यातील उर्वरित 32 जिल्हयांसाठी प्रत्येकी 1 याप्रमाणे 50 वसतीगृहांना 100 प्रवेशित क्षमतेची इमारत भाडेतत्वार उपलब्ध करुन घेऊन नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतीगृह ही सुधारित योजना राबविण्यात येत आहे.

शासन निर्णयामध्ये परिशिष्ट अ मध्ये योजना राबविणाऱ्या संस्थासाठी मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. तसेच विशिष्ट ब मध्ये संस्थाकडून भाडेतत्वावर चालविण्यात येणाऱ्या वसतीगृहासाठी मंजूर करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व अटी याबाबत तरतूद नमूद करण्यात आहे. तरी सिंधुदुर्ग येथे नोकरी करणाऱ्या महिलांसाठीचे वसतीगृह भाडेतत्वावरिल इमारतीमध्ये सुरु करण्यासाठी जिल्हास्तरावर इच्छूक संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय 02362 228869 सिंधुदुर्गनगरी येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here