माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची विधान परिषेदवर बिनविरोध निवड

0
80

माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची विधान परिषेदवर बिनविरोध निवड झाली आहे. विधान परिषदेच्या शरद रणपिसे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसने डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार डॉ. सातव यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपाचे संजय केणेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांच्या निवडीचे वृत्त कळताच जिल्हयात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर आता हिंगोली जिल्हयात काँग्रेसला बळ मिळणार आहे.

माजी खासदार राजीव सातव यांचे कोविडमुळे निधन झाल्यानंतर हिंगोली जिल्हयात काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संभ्रमाची स्थिती झाली होती. त्यातच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनीया गांधी, काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी सातव कुटुंबियांचे राजकिय पुनर्वसन करण्याचा शब्द दिला होता. या शिवाय गांधी परिवार व काँग्रेस पक्ष सातव कुटुंबियांच्या सदैव पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here