माझ्यावर टीका करून कुणी आमदार होऊ शकत नाही; दीपक केसरकर

0
101

येत्या वर्षभरात सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला नगरपालिकेत चमत्कार दिसेल .

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब हेल्थ पार्क आणि उद्यान मध्ये अपहार झाल्याचे खोटे आरोप माझ्यावर करून उपोषण करणार असल्याचे सांगत आहेत. परंतु त्यांच्या या वक्तव्याला मी महत्त्व देत नसून, येणारी निवडणूक लक्षात घेऊन ते स्टंटबाजी करत आहेत. माझ्यावर टीका करून संजू परब कधीच आमदार होऊ शकत नाहीत. असा टोला आमदार दिपक केसरकर यांनी संजू परब यांना लगावला आहे.
ते पुढे म्हणाले हेल्थ पार्क मधील ते काम एम टी डी सी चा विषय असून, त्यात आमदार म्हणून माझा किंवा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा काहीही संबंध नसून, आमच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. चूक कोणाकडूनही होऊ शकते. त्यामुळे त्यांनी अपहार केला. असे म्हणणे चुकीचे आहे. त्यामुळे संजू परब यांनी आरोप करणे थांबवून विकास कामांकडे लक्ष द्यावे. आपण आतापर्यंत तालुक्यात अनेक विकासकामे केली आहेत. परंतु, त्यावर संजू परब कधीही बोलले नाहीत. असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत. येत्या वर्षभरात सावंतवाडी – वेंगुर्ला- दोडामार्ग नगरपालिकेत चमत्कार दिसेल असे संकेत देखील त्यांनी यावेळी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here