‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेनेही दोन-तीन दिवसांच्या फरकासह ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे.बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘यास’ चक्रीवादळामुळे मान्सूनचे लवकर म्हणजे २७ ते २९ मेपर्यंत आगमन होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण आता ३० मे ते एक जूनदरम्यान आगमनाची शक्यता आहे.
अंदमान-निकोबार द्वीप समूहात २१ मे रोजी आगमन झाल्यानंतर तो सतत उत्तर-पश्चिम दिशेने आगेकूच करत आहे. तो सध्या श्रीलंकेच्या उत्तर भागापर्यंत पोहोचला असून गुरुवारी त्याने मालदीवही ओलांडले आहे.