मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत 52 हजार कोटींची घसरण

0
91

सोमवारी रात्री फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया साइट्स सुमारे सहा तास ठप्प पडल्या होत्या. यामुळे भारतासह संपूर्ण जगभरातील यूजर्स अस्वस्थ झाले होते. तब्बल सहा तासांनंतर सेवा पूर्ववत झाली. दरम्यान फेसबुकने कॉन्फिगरेशनमध्ये झालेल्या चुकीच्या बदलांमुळे सेवा ठप्प होती अशी माहिती दिली

फेसबुक ठप्प पडल्यापासून त्याच्या कारणाबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात होते. सायबर तज्ज्ञांच्या मते,बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल (बीजीपी) मुळे ही समस्या निर्माण झाली आहे. फेसबुकने अनेक राउंटिंग बदल केले, ज्यामुळे फेसबुकचे डोमेन नेम सिस्टम (DNS) सर्व्हर बंद झाले. इंटरनेटची निर्देशिका म्हणून DNS सर्व्हरचा समजला जातो फेसबुकने केलेल्या बदलांमुळे, DNS सर्व्हर बंद झाला, ज्यामुळे ही समस्या आली.

फेसबुक कर्मचाऱ्यांनी मात्र नाव न छापण्याच्या अटीवर रॉयटर्सला सांगितले की, अंतर्गत चुकीमुळे सेवा ठप्प झाली होती. इंटरनेट ट्रॅफिक ज्या पद्धतीने सिस्टीमकडे वळवले जाते त्यात झालेल्या चुकीमुळे सेवा ठप्प झाली. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि मेसेंजर सेवा पुन्हा ऑनलाइन उपलब्ध आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here