मालवणमधील 64 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात !

0
93

सिंधुदुर्गनगरी, – एका ६४ वर्षीय आजोबाना कोरोनाची लागण झाली. आधीच आजोबा मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखी व्याधीने ग्रस्त होते. या रोगांसाठी त्यांना दररोज 11 गोळ्या घ्याव्या लागत होत्या. अशातच . कोरोनाची लक्षणे दिसू लागली होती.प्रचंड ताप आणि डायरिया यामुळे प्रकृती नाजूक झाली होती. पण, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्यापूर्ण उपचारामुळे कोरोनावर मात करु शकलो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

मालवण येथील या आजोबांना कोरोनाचे निदान झाल्यानंतर 2 दिवस गृह अलगीकरणात ठेवण्यात आले होते. पण, त्यांची प्रकृती बिघडत गेली. डायरिया मुले खूप अशक्तपणा आला होता. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मधुमेह आणि उच्चरक्तदाब असल्यामुळे त्यांना अधिक काळजीपूर्वक निरिक्षणाखाली ठेवून औषधोपचार देणे गरजचे होते. तसेच घाबरल्यामुळे त्यांचे मानसिक मनोबलही कमी झाले होते. या सर्वांचा विचार करून त्यांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष देण्यात आले.

त्यांच्या नियमित औषधांसोबतच कोरोनावरील उपचारही सुरू करण्यात आले. वेळोवेळी रक्त तपासणी आणि इतर तपासण्या करून औषधांमध्ये बदल करण्याविषयी निर्णय घेतले जात होते. तसेच त्यांना मानसिक समुपदेशनही करण्यात येत होते. त्याचबरोबर त्यांच्या आहाराचे नियोजनही तितकेच महत्वाचे होते. विशेष म्हणजे त्यांच्या प्रकृती विषयी त्यांच्या कुटुंबियांना रोजच्या रोज दूरध्वनीवरून माहिती दिली जात होती.

कोरोनावर मात केल्यानंतर घरी परतल्यावर या सर्वाविषयी बोलताना त्यांचा मुलगा म्हणाला, योग्य औषधोपचार, मानसिक समुपदेशन आणि आहाराचे योग्य नियोजन यामुळेच आमच्या वडिलांना आज दुसरा जन्म मिळाला आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कार्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. सरकारी रुग्णालयात जाण्याची आमची ही पहिलीच वेळ होती. तिथे कसे उपचार होतील, व्यवस्था कशी असेल याविषयी मनात शंका होती. रुग्णालयातील सोयींबाबत आम्हाला फारशी अपेक्षा नव्हती. पण, ज्या प्रकारच्या सुविधा, जेवण आमच्या रुग्णाला तिथे मिळाले ते पाहून आमचा ग्रह पूर्ण पालटला. उत्तम प्रकारचे उपचार आणि सोयी यासह सर्वांचे चांगले सहकार्य लाभले. तसेच इतर आजार जसे मधुमेह, उच्चरक्तदाब, कॅन्सर असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांनी घरीच उपचार न घेता रुग्णालयामध्ये जाऊनच उपचार घ्यावेत. जिल्हा रुग्णालयामध्ये उत्तम प्रकारचे उपचार केले जात आहेत. डॉक्टर्स व नर्स घरच्या प्रमाणे रुग्णांची काळजी घेत आहेत. प्रत्येक रुग्णाला त्यांच्या प्रकृती प्रमाणे उपचार केले जात आहेत. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी इतर आजार असणाऱ्यांनी घरी उपचार न घेता जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घ्यावेत असे आवाहनही त्यांनी केले आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here