जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीने नद्यांच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. अनेक गावांचे रस्ते पुराच्या पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला आहे .वाहतूक थांबली आहे.
मालवण तालुक्यातील ततेरई येथील डोंगर खचत असल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. तेरतोय डोंगराला भेगा पडल्या आहेत .जमीन दबली गेली आहे. त्यांउळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. घटनेची भूगर्भ विभागाच्या प्रतिनिधीकडून पहाणी करण्यात आली.