मालवण तालुक्यात शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ

0
84

पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती

    शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबविले जात असून आज मालवण तालुक्यातील शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत दैवज्ञ भवन येथे झाला. त्यानंतर कोळंब, देवबाग, चौके, वराड या पंचायत समिती मतदारसंघ निहाय शिवसंपर्क अभियाना निमित्त बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. 
    यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले,  शिवसेना पक्षाची ताकद आपल्याला वाढवायची आहे. त्यामुळे आपल्या सरकारच्या माध्यमातून झालेली विकास कामे लोकांपर्यत पोहोचविण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे. शिवसैनिकांनी एकजुटीने शिवसेना पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत जनतेच्या अडीअडचणींना धावून जाणारा म्हणून शिवसैनिकांची ख्याती आहे. त्यादृष्टीने अधिक जोमाने काम करावे असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले. 

   याप्रसंगी मालवण येथे जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, गणेश कुडाळकर, सेजल परब, पूनम चव्हाण, शिला गिरकर, 
    कोळंब हडी येथे विभागप्रमुख बाबू आंगणे, अमोल वस्त, पूजा तोंडवळकर, मीनल परब, विजय नेमळेकर, सौरभी अमरे, संतोष अमरे, प्रभाकर चिंदरकर, संदीप हडकर, चौके येथे देवली सरपंच गायत्री चव्हाण, बीजी गावडे, संजय गावडे, विशाल धुरी
      देवबाग वायरी येथे भगवान लुडबे, जयवंत लुडबे, शामा झाड, प्रसाद आडवणकर, बंड्या लुडबे, प्रदीप वेंगुर्लेकर, अनिल केळुसकर, फिलसू फर्नांडिस, मकरंद चोपडेकर, संजय केळुसकर, नाना नाईक, प्रमोद भोगावकर 
     वराड येथे पं. स.सदस्य विनोद आळवे, बाबू टेंबुलकर, देवदास रेवडेकर, शाखा प्रमुख आप्पा आळवे, संतोष म्हाडगूत, किशोर भगत, ग्रा. प. सदस्य विकास वराडकर, योगेश वराडकर, वैभव म्हाडगूत, राजू घाडी, विकी गावडे, राजू परुळेकर, दादा वायंगणकर, डॉ. सावंत, श्री. भगत, आनंद चिरमुले आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here