‘माविम’तर्फे मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत पत्रकार कक्षात मास्कचे वाटप

0
87

सिंधुदुर्गनगरी – मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ आणि रिलायन्स फौंडेशनच्या माध्यमातून येथील पत्रकार कक्षात मास्कचे वाटप करण्यात आले. आज अखेर जिल्ह्यात 14 हजार मास्कचे वाटप झाले असून यात अधिकारी, पदाधिकारी, बचत गटाच्या महिला कर्मचारी यांचा समावेश आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर, उपाध्यक्ष लवू म्हाडेश्वर, सचिव नंदकुमार आयरे, संदीप गावडे, विनोद दळवी, मनोज वारंग, देवयानी वरसकर, सागर चव्हाण, पांडुरंग गावकर, शांताराम राऊत, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी नितीन काळे, क्षेत्रीय समन्वयक खेमराज सावंत आदी यावेळी उपस्थित होते.

‘माविम’च्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये बचतगटातील सीएमआरसीचे कर्मचारी त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पशुधन विभाग, एपीएमसी, जिल्हा नियोजन कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय येथील अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी अशा सर्वांना मास्कचे वाटप करण्यात आले आहे. स्वतः ही मास्कचा वापर करावा आणि इतरांनाही करण्यास भाग पाडावे जेणेकरून आपली आणि इतरांची सुरक्षितता बाळगली जाईल या हेतूने या मास्कचे वितरण करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here