कराड दि.१२ :- माहिती व जनसंपर्क संचालनालयातील माजी माहिती संचालक दिनकरराव विष्णु कचरे (वय 87) यांचे आज पहाटे निधन झाले. पाटण तालुक्यातील खळे हे त्यांचे मुळ गाव असलेतरी मात्र नोकरीदरम्यान ते सातारा येथे रहात होते.श्री. कचरे यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, तत्कालीन गृहमंत्री (कै) बाळासाहेब देसाई यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले. ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्याकडेही त्यांनी काम केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात त्यांनी सहाय्यक ते माहिती संचालक या पदापर्यंत काम केले होते. त्यांना तीनवेळा संचालक पदावर मुदतवाढ मिळाली. शेवटच्या टप्यात त्यांनी काही काळ माहिती महासंचालक म्हणुनही त्यांनी काम केले.