मुंबईतल्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात उड्डान पूलाचा काही भाग कोसळला

0
94

मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता उड्डानपूलाचा भाग कोसळला. या दुर्घटनेत 13 बांधकाम कामगार जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे.ही घटना शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता घडली.

‘एएनआय’नं दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतल्या बांद्रा-कुर्ला कॉम्पेक्स परिसरात उड्डान पूलाचं काम सुरू आहे. याच पूलाचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत 13 बांधकाम कामगार जखमी झाले आहे. जखमींना तातडीनं जवळच्या बीएन देसाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

मुंबईतील बीकेसी मुख्य रस्ता आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडला जोडणारा हा उड्डाण पूल आहे. त्याचाच एक भाग कोसळला आहे.या दुर्घटनेत 13 जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here