मुंबईत सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी!

0
61

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे वेधशाळेने पुणे, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज दोन दिवसांपूर्वी वर्तविला होता.मुंबईत उकड्याने अंगाची लाहिलाही होत आहे. उन्हाच्या झळापासुन बचाव करण्यासाठी मुंबईकर शीतपेये पिण्यावर भर देत आहेत. असे असतानाच आज सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना सुखद गारवा मिळाला. मात्र पावसामुळे उकड्यात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here