मुंबईत ५० टक्के बालकांमध्ये आढळल्या करोनाच्या अँटिबॉडीज

0
78
H3N2 विषाणू
H3N2

करोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत असताना दुसरीकडे देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सरकार आणि प्रशासनाची तयार होताना दिसत आहेत. त्यातच कोरोनाच्या विषाणूत झालेला बदल आणि त्यातून तयार झालेल्या नव्या Delta आणि Delta Plus या व्हेरिएंट्समुळे चिंता वाढली आहे.

करोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांमध्ये धोका अधिक असल्याची मत अनेक तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आले आहे.त्यामुळे मुंबईतील महानगर पालिकेच्या नायर रुग्णालय आणि कस्तुरबा मोलेक्युलर डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी यांच्यामार्फत लहान मुलांमध्ये करोनासाठी सर्वे करण्यात आला.हा सर्वे १ एप्रिल २०२१ ते १५ जून २०२१ दरम्यान करण्यात आला.या सेरो सर्व्हेसाठी मुंबईच्या सर्व २४ वॉर्डमध्ये मिळून एकूण २ हजार १७६ नमुने गोळा करण्यात आले. यासाठी आपली चिकित्सा नेटवर्क आणि पालिकेच्या नायर हॉस्पिटलमधून १ हजार २८३ तर ८९३ नमुने हे दोन खासगी प्रयोगशाळांमधून गोळा करण्यात आले आहेत. पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दुसऱ्या लाटेदरम्यानच हा सेरो सर्व्हे करण्याचे निर्देश दिले होते.

मुंबईत करण्यात आलेल्या सेरो सर्व्हेमध्ये शहरातल्या तब्बल ५० टक्क्यांहून जास्त लहान बालकांमध्ये करोनाच्या अँटिबॉडीज सापडल्या असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. याआधी करण्यात आलेल्या सर्व्हेपेक्षा आत्ताच्या सेरो सर्व्हेमध्ये मुंबईतल्या लहान मुलांमध्ये करोना अँटिबॉडीज सापडण्याचं प्रमाण वाढल्याचं देखील समोर आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here