मुंबईच्या वांद्रे परिसरातून क्राईम ब्रॅंचने तब्बल 1 कोटी 18 लाखांचा चरस जप्त केला आहे. वांद्रेच्या चिचंवाडी वॅाटर फिल्टर रोड, चायना गेट हाँटेलजवळ हा चरसचा साठा लपवून ठेवला असल्याची माहिती गुन्हे शाखा 7 च्या पोलिसांना मिळाली होती.
मुंबईच्या विविध भागातून चरस तस्करीसाठी या दोन महिलांकडे येत असल्याचे देखील या तपासात समोर आले आहे.किशोरी गवळी (57), जोहराबी शेख, अकबरअली शेख (75) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीसांनी यांना ताब्यात घेतले आहे. त्यांचा अधिक तपास करणे चालू आहे