मुंबई पोलिसांनी 1 किलो चरस जप्त करत यूट्यूबरला अटक

0
86

मुंबईतील ड्रग्स प्रकरणात दररोज अनेक लोकांना बेड्या घालत आहे. मुंबई पोलिसांनी शुक्रवारी आरोपींकडून 1 किलो चरस जप्त करत एका यूट्यूब चॅनेलच्या संचालकाला अटक केली आहे.जप्त करण्यात आलेल्या चरसची किंमत 50 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

एएनसीचे वांद्रे युनिट पश्चिम उपनगरात गस्त घालत होते. या दरम्यान, एएनसीला अंधेरी पश्चिमेतील जुहू-वर्सोवा लिंक रोडवरील राजश्री इमारतीजवळ एक संशयास्पद व्यक्ती फिरताना दिसून आली. या तरुणाजवळ एक लाल पिशवी होती. संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी या बॅगमध्ये काय आहे असे विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून त्याला अटक करून पिशवीत काय आहे याचा शोध पोलिसांनी घेतला.

आरोपीचे नाव गौतम दत्ताला (43) असूनउपनगर अंधेरी (पश्चिम) येथून अटक केली. तो जुहू-वर्सोवा लिंक रोड परिसरातील रहिवासी असून एका यूट्यूब चॅनेलचा संचालक आहे. त्याचे वडील संगीत दिग्दर्शक आहेत. चित्रपट कलाकारांना चरस पुरवल्याचा संशय असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here