मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि एशियाटिक सोसायटीतील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे होणार डिजिटायझेशन

0
59

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे आणि एशियाटिक सोसायटी, मुंबई या संस्थेकडे असलेल्या दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्यासाठी या दोन्ही संस्थांना प्रत्येकी ५ कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

श्री.सामंत म्हणाले, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय या ग्रंथालयाची स्थापना दिनांक १ ऑगस्ट, १८९८ साली झाली. सद्य:स्थितीत हे ग्रंथालय शासनमान्य “जिल्हा -अ” वर्ग ग्रंथालय म्हणून कार्यरत आहे. या ग्रंथसंग्रहालयामध्ये १,९३,४०० इतकी ग्रंथ संख्या असून दोलामुद्रिते ५,००० आहेत. या ग्रंथालयामध्ये हस्तलिखित पोथ्या, विविध लेखकांचे साहित्य, हस्ताक्षरे यांचा संग्रह असून त्यांचे जतन, संरक्षण व संवर्धन करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेता या दुर्मीळ ग्रंथांचे व हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्यासाठी रूपये ५ कोटी विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here