मुंबई: महाराष्ट्र बंदची हाक, आठ बसेस शहराच्या विविध भागात क्षतिग्रस्त

0
123

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडले. यामध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी सहमती दर्शवली आहे. तर राज्यातील अनेक शेतकरी संघटना, व्यापारी संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे.

प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने बंदमध्ये सहभागी व्हावे असे शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून आवाहन करण्यात आले आहे.देशासाठी बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आमचा महाराष्ट्र बंद आहे असेही सांगितले आहे.राज्यात अनेक ठिकाणी शांततेत बंद पाळण्यात येत असताना सोलापूरात युवा सेना आक्रमक झाली आहे .माळशिरस तालुक्यात संगम येथे टायर जाळून बंदची सुरुवात केली आहे .युवा सेना तालुका प्रमुख गणेश इंगळे शहर प्रमुख शेखर खिलारे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र बंद आंदोलन सुरु केले.केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्री याचा निषेध करत राजीनामा द्यावा, अशी मागणी करत भारतीय शेतकरी जिंदाबाद अशा घोषणा चालू आहेत.


मुंबई, पुणे, नागपूरसह सर्व प्रमुख शहरांमध्ये रस्त्यावर वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तीन पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते बंद यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे .प्रवाशांचे प्रचंड हाल, रिक्षा आणि टॅक्सी चालक दुप्पट पैसे आकारत आहेत.रात्री उशिरापासून आतापर्यंत त्यांच्या आठ बसेस शहराच्या विविध भागात क्षतिग्रस्त झाल्या आहेत. शिवसैनिक आणि काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.पूर्व द्रुतगती महामार्गावर ठिया आंदोलन करण्यात आले आहे.चेंबूरच्या अमर महल चौकात रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करत काँग्रेस आणि शिवसेनेने वाहतूक रोखली आहे.

महाराष्ट्रातील जनतेला सणासुदीच्या काळात वेठीस धरण्याचं हे कसलं राजकारण असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संतप्त सवाल केला आहे .तसेच महाराष्ट्र बंदला मनसेचा विरोध आहे असेही म्हंटले आहे.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here