मुंबई लोकलमध्ये विषारी गॅस सोडण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन

0
104

आज पहाटे महाराष्ट्र एटीएसने एका संशयित दहशतवाद्याला जोगेश्वरीमधून अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी कट रचणाऱ्या सहा दहशतवाद्यांना अटक केली.या दहशतवाद्यां च्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दहशतवाद्यांनी मुंबई लोकलमध्ये विषारी गॅस सोडण्याचा प्लॅन रचला होता. त्यामुळे मुंबईतील रेल्वे सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

कोणतीही संशयास्पद हालचाल दिसली तरी देखील तात्काळ तपासणी केली जावी असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकावरील मुख्य प्रवेशद्वार सोडून इतर गेट बंद करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here