‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ मुख्य भूमिकेत सोनाली कुलकर्णी

0
116

मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या आगामी चित्रपटातून छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा दाखविली जरा आहे.हा चित्रपट मराठी आणि इंग्रजी भाषेत चित्रित होणारा आहे. जगातील पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शौर्य, धैर्य अन् पराक्रमाची ज्वलंत आख्यायिका असलेल्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिका साकारणार आहे. चित्रीकरण आणि तांत्रिक बाबी देखील लंडनमध्येच होणार असून ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे.

छत्रपती महाराणी ताराबाई भोसले मुघलांना सळो की पळो करून सोडणाऱ्या या रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या इतिहासातील एक कर्तृत्ववान राजस्त्री होत्या. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती राजाराम भोसले यांच्या पत्नी असणाऱ्या ताराबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामागे कणखरपणे स्वराज्याची धुरा सांभाळली. मुघल, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी या सत्तांविरूद्ध त्यांनी निकराचा लढा दिला. त्या एक उत्तम राजकारणी, व्यवस्थापिका तर होत्याच याव्यतिरिक्त एक आदर्श सून, पत्नी आणि माता या जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या. अशा या रणरागिणीची शौर्यगाथा या चित्रपटात मांडण्यात येणार आहे.

अक्षय विलास बर्दापूरकर, ‘प्लॅनेट मराठी’, ‘गोल्डन रेशो फिल्म्स’ यांच्याबरोबर अमेरिकेची ‘ब्लॅक हँगर स्टुडिओज’ आणि ‘ओरवो स्टुडिओज्’ या चित्रपटातून मराठीही पदार्पण करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here