मोठी बातमी: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे रुग्णालयात! प्रकृती चिंताजनक

0
98

”बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिया होऊन वृद्धपकाळाने ते गेल्या आठवडाभरापासून दिनानाथ रुग्णालयामध्ये दाखल आहेत. प्रकृती खूप खालावलेली असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत ते व्हेेंटीलेटरवर आहेत. ”, अशी माहिती दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी कोथरूड येथील घरात बाबासाहेब पुरंदरे हे पाय घसरून पडले होते. त्यावेळी त्यांच्या डोक्याला इजा झाली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठवड्याभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक झाली. बाबासाहेबांची प्रकृती सुधारावी यासाठी डॉक्टरांकडून अथक प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती बाबासाहेबांचे सुपूत्र अमृत पुरंदरे यांनी दिली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी 29 जुलै 2021 रोजी वयाच्या 100 व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्त पुण्यातील कात्रज येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले उपस्थित होत्या. या कार्यक्रमात बाबासाहेबांचा सत्कार करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here