म्यानमार सैन्याशी व्यावसायिक संबंध असल्याने ‘अदानी पोर्ट्सला’ अमेरिकेच्या बाजाराने केले बेदखल

0
83
'अदानी पोर्ट्सला'

म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारीत लष्कराने सत्तापालट केले होते. जनतेद्वारे निवडण्यात आलेल्या आंग सांग सू यांच्या सरकारला सत्तेतून बेदखल केले. यामुळे म्यानमारच्या जनतेने सैन्यविरोधी निदर्शने चालू केली. या निदर्शनांत भाग घेतलेल्या म्यानमारच्या जनतेवर लष्कराने गोळीबार केला होता. त्यामध्ये 700 हून जास्त लोक मरण पावले आहेत. मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप अमेरिकेसह अनेक देश आणि मानवाधिकार कार्यकर्ते म्यानमारच्या लष्करावर करत आहेत.

APSEZ ही अदानी समूहाची कंपनी म्यानमारमधील यॅंगून येथे बंदर बनवत आहे. या बंदरासाठी म्यानमार इकोनॉमिक कॉर्पोरेशनने (MEC) जमीन दिली असून या म्यानमार इकोनॉमिक कॉर्पोरेशनला तेथील लष्कराचा म्हणजेच सैन्याचा पाठिंबा आहे.अदानी पोर्ट्सचा म्यानमारच्या लष्कराशी व्यावसायिक संबंध असल्याने ट्रेजरी डिपार्टमेंट ऑफिस ऑफ फॉरेन असेट्स कंट्रोलने आपल्या निर्देशांकातून APSEZ ला वगळले आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये 4% पेक्षा जास्त घसरण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here