“यास” चक्रीवादळ उद्या बुधवारी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला दिला आहेच.त्यामुळे या वादळाचे पडसाद आजपासूनच बंगालमधील दिघा आणि ओडिसातील भुवनेश्वर,चांदीपूरसह अनेक भागात दिसून येऊ लागले आहेत.आता इथे पावसाने हजेरी लावली आहे. यास चक्रीवादळ धोकादायक बनत चालले आहे. हवामान खात्याने बिहार आणि झारखंड राज्यालादेखील सतर्कतेचा इशारा दिला आहे.
समुद्रात 2 मीटर ते 4.5 मीटर उंचीच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने (एनडीआरएफ) पूर्व मेदिनीपूर आणि दिघाचे अनेक भाग रिकामे करायला सुरुवात केली आहे. हे चक्रीवादळ पारादीप आणि सागर बेटावर उद्या धडकणार असून यावेळी वाऱ्यांचा वेग हा155 किमी राहणार आहे. शासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.