अतिवृष्टीमुळे दरड कोसल्यामुळे रत्नागिरी ते कोल्हापूर मार्गावर असणाऱ्या आंबा घाटातील वाहतूक पूर्णतः बंद झाली होती. हा मार्ग आज सुरु करण्यात आला आहे. मात्र हलकी वाहनेच यावरून जाऊ शकतील. जड वाहनांची वाहतूक पुढील सूचनेपर्यंत बंद राहील.
कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग १६६ वरील साखरपा ते आंबा या घाट भागात मुसळधार पावसामुळे बारा ठिकाणी दरड कोसळून मार्ग बंद झाला होता. सदर महामार्गावरील दरड मातीच्या ढिगारे काढून महामार्ग दिनांक ५ ऑगस्ट २०२१ पासून हलक्या वाहनांसाठी सुरु करण्यात येत आहे. जीप,ऍम्ब्युलन्स,मालवाहतुकीची छोटी वाहने इत्यादीकरता सुरु करण्यात आली आहे. एकूण १३७.२८५ कि.मी रस्त्यांपैकी ७१४०० कि.मी रस्त्यावर मुख्य दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.