रत्नागिरीतील पंधेरी धरण फुटीची मार्गावर, हायअलर्ट जारी

0
98

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यातील पंधेरी धरणाची गळती वाढली आहे. त्यामुळे धरणाची भिंत तुटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे धरणाच्या परिसरातील लोकवस्ती खाली करण्यात आली आहे. NDRF च्या पाच टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहे.
पंधेरी धरणाची परिस्थिती अतिशय गंभीर असून या धरणाची गळती रोखण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु मंगळवारी दिवसभर काम करून सुद्धा या धरणाची गळती थांबली नाही. त्यामुळे धरण फुटीचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील प्रशासन मात्र कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे. धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा मदतीसाठी उपलब्ध ठेवण्यात आला आहे. चार रेस्क्यू टीम या ठिकाणी तैनात आहेत. तसंच एनडीआरएफची एक तुकडी सर्व महसूलचे अधिकारी लघु पाटबंधारे विभागाचे जिल्ह्यातील सर्व अधिकारी या ठिकाणी दाखल आहेत. या धरणाची तीव्रता लक्षात घेऊन सर्व उपाय योजना करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here