रत्नागिरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस गस्त घालत असताना टीआरपी येथे रेल्वेपुलाजवळ फैजान निसार हाजू याच्याकडून प्लास्टिकच्या पिशवीतील 3 किलो 34 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ जप्त केला. त्याच्याकडून एकूण 41 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फैजान हाजू याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.