रत्नागिरी कोळंबे,चरवेली ग्रामपंचायत नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा संपन्न

0
97

आज ग्रामपंचायत, चरवेली ( रत्नागिरी ) नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी, नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, जि.प.सदस्य बाबूशेठ म्हाप, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, राहुल पंडित, पं.स.उपसभापती उत्तम सावंत, साक्षी रावणंग, सरपंच सुरेश सावंत, प्रांत व संबंधित उपस्थित होते.ग्रामपंचायत इमारतीचा वापर विकासात्मक दृष्ट्या काम करण्यासाठी झाला पाहिजे तसेच कामासाठी येथे येणारा प्रत्येक नागरिक येथून समाधानी होऊन जाईल अशी अपेक्षा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.चरवेली गाव मुंबई-गोवा महामार्गावर वर असल्याने त्याला वेगळे महत्त्व आले आहे. महामार्गाचे काम पूर्ण होताच या ठिकाणी फूडमॉल उभारून त्या फूडमॉल च्या माध्यमातून येथील तरुण-तरुणींसाठी रोजगार निर्मिती केली जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले

आज ग्रामपंचायत, कोळंबे ( रत्नागिरी ) नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी, जिल्हा सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जि.प.सदस्य बाबूशेठ म्हाप, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, पं.स.सभापती जयाशेठ माने, परशुराम वेल्हे, वेदांती पाटणे, सरपंच रघुनाथ पडवळ व संबंधित उपस्थित होते.या नूतन इमारतीचे उपयोग विकासात्मक दृष्ट्या काम करण्यासाठी करा. येथील विकास कामे करण्यासाठी आपण कटिबद्ध असून या इमारतीमध्ये सभागृहासाठी पुढच्या वर्षी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासनही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यावेळी दिले.

चरवेली गावातील ग्रामपंचायतीसाठीच्या इमारतीस जागा दिल्याबद्दल प्रदीप सावंत व शशिकांत सावंत यांचा सत्कारही मा.उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कोळंबे गावचे शंकर कांबळे, अशोक कांबळे, शांताराम कांबळे यांनीही कोळंबे येथील ग्रामपंचायतीसाठीच्या इमारतीस जागा दिल्याबद्दल मा.उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

चरवेली ( रत्नागिरी ) नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here