रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीने नोटीस दिली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेली कर्जे आणि त्याचबरोबर बँकेतील अन्य माहितीही ईडीने मागवली आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे हे उद्या दि. 15 जुलै रोजी ईडीला माहिती देणार आहेत.त्यांनी सांगितले की, आम्हाला ईडीची नोटीस आली आहे. त्याप्रमाणे आम्ही त्यांना माहिती देणार आहोत. 10 वर्षांपूर्वी प्रकार घडला त्याला आम्ही कोणी जबाबदार नाही. हे केवळ राजकारण आहे असे मत डॉ. चोरगे यांनी व्यक्त केले. ईडीने यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेकडूनही माहिती मागवली आहे.