रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी 70 कोटींचा निधी

0
104

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारकडून रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा परिषदेला 70 कोटी रूपयांचा निधी मिळणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील विकासकामांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावेळी दिले.यामध्ये जिल्हा परिषदेची नवीन इमारत,जिल्हा परिषदेच्या स्व-उत्पन्नातील वाढ आणि विकासकामांच्या निधीवरील व्याजाचे पैसे यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी तात्काळ कार्यकारी अभियंता आणि अन्य अधिकारी देण्यासंबंधी तसेच जिल्हा परिषदे योजना राबविण्यासाठी एजन्सी देण्याची सूचना त्यांनी केली. जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या समोर मांडला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ पुरवणी अर्थसंकल्पात पाच कोटी रूपयांची तरतूद करण्यासंबंधी आणि त्यानंतर इमारतीसाठी जे काही 55 कोटी लागतील तेही देण्याचे आश्वासन देत पहिले पाच कोटी डिसेंबर महिन्यात देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here