रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार बांधवांच्या अडचणींबाबत आज बैठक घेण्यात आली.वृत्तपत्र विक्रेत्यांची चाचणी करणे,वृत्तपत्र विकण्याची वेळ निश्चित करणे तसेच नियमांचे पालन करणे आदि विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व पत्रकार उपस्थित होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व ठिकाणी बंद चे पालन होत आहे तसेच विनाकारण शहरात फिरणाऱ्यांच्या Antigen चाचण्या करण्यात आल्या आहेत .
कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्रिपरिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व प्रकारची वाहतूक सुरु असली तरी गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्यात आली आहे. खासगी कार्यालय घरूनच काम करत आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु आहेत. तसेच रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी जाहीर करण्यात आली आहे.