रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांना कोविडच्या पार्श्वभूमीवर सहकार्याचे आवाहन

0
110

रत्नागिरी- आगामी गणेशोत्सव निमित्त राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबाबत डिएम डॉ. बी. एन. पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व गावांच्या हद्दीतील पोलिसठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.त्याप्रमाणे त्यांनी विविध ठिकाणच्या विसर्जनाच्या घाटांची पाहणी केली.

खेड पोलीस ठाणे हद्दीमधील विविध ठिकाणच्या गणेश विसर्जन घाटांची पाहणी SDPO श्री. काशीद यांनी तहसीलदार खेड, श्रीमती. प्राजक्ता जगताप व पोलीस निरीक्षक श्रीमती. जाधव यांच्या उपस्थितीत केली.
देवरुख पोलीस ठाणे येथे पो.नि. जाधव यांनी देवरुख येथील शांतता समितीची व ग्रामस्थांची बैठक घेऊन आगामी गणेशोत्सव निमित्त राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबाबत सूचना दिल्या.

दापोली पोलीस ठाणे येथे स.पो.नि. ढेरे यांनी सर्व पोलीस पाटील यांची बैठक घेऊन आगामी गणेशोत्सव निमित्त राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबाबत सूचना दिल्या. सावर्डे पोलीस ठाणे येथे पो.उनि. करंजकर यांनी असुर्डे गावातील ग्रामस्थांची बैठक घेऊन आगामी गणेशोत्सव निमित्त राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबाबत सूचना दिल्या.चिपळूण,गुहागर,राजापूर पोलीस ठाणे बाणकोट पोलीस ठाणे ,सावर्डे पोलीस ठाणे या सर्व हद्दीत गणेशोत्सव बाबत कोविड संरक्षणाची यंत्रणा असणार आहे .तरी जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here