रत्नागिरी – जिल्ह्यात नव्याने 590 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तर 6 हजार 826 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 24 तासात 6 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
नव्याने 590 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 58 हजार 516 इतकी झाली आहे. बुधवारी 6 हजार 826 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आता पर्यंत 3 लाख 31 हजार 907 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 24 तासात 429 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. आता पर्यंत 50 हजार 983 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 87.12 टक्के आहे.