रत्नागिरी: पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून गणपतीपुळे येथे MTDC बोट क्लब सुरु

0
79

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून गणपतीपुळे येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) बोट क्लब सुरु केले आहे.या प्रकल्पाला आज आदित्य ठाकरे त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

यावेळी, उदय सामंत ,नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, जि.प.सदस्य बाबूशेठ म्हाप, प्रादेशिक अधिकारी दीपक माने व संबंधित उपस्थित होते.

तसेच रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत भगवतीनगर – धनगरवाडी ( रत्नागिरी ) येथील शाळेच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी, नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, जि.प.सदस्य बाबूशेठ म्हाप, विभागप्रमुख उत्तम मोरे, संजना माने, साधना साळवी, गजानन पाटील, सरपंच नूतन मायंगडे व संबंधित उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here