रत्नागिरी: रस्त्यावर आढळले पाच दिवसाचे अर्भक

0
65

चिपळूण- शहरातील गुहागर बायपास रस्त्यालगत पाच दिवसाचे अर्भक आढळून आले आहे. स्त्री जातीचे हे अर्भक असून मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणाला ते आढळून आले.

शहरातील उक्ताड ते पाग दरम्यान असलेल्या गुहागर बायपास रस्त्यालगत एका पिराजवळ हे अर्भक आढळून आले. पाच दिवसांचे अर्भक असून एका कपड्यांमध्ये गुंडाळलेल्या स्थितीत ते होते. या रस्त्यावरून मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका तरुणाला या अर्भकाचा आवाज आला. त्याने आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा तिथे त्याला एका कपड्यांमध्ये गुंडाळलेल्या स्थितीत अर्भक दिसून आले. त्याने तात्काळ पोलिसांना संपर्क करून याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या अर्भकाला कामथे रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केली. अर्भकाची प्रकृती सुस्थितीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here