रत्नागिरी शहरात भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी राज्य सरकारने मंजूर केला 3 कोटीचा निधी

0
94

जागतिक बँकेच्या सहाय्याने नॅशनल सायक्लोन रिस्क मिटिगेशन प्रोजेक्टअंतर्गत राज्याच्या किनारपट्टीवरील भागात 397 कोटी 97 लाख रुपयांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांतर्गत किनारपट्टीवरील जिह्यांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेसाठी  जागतिक बँकेच्या सहाय्याने राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत रत्नागिरी शहरात भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी  1 कोटी 26 लाख 24 हजार 145 कोटी रु. आणि अन्य एका प्रकल्पासाठी   2 कोटी 58 लाख 65 हजार 974 रुपये अशा प्रकारे 3 कोटी 84 लाख रुपयांहून अधिकचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे.रत्नागिरीत भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याचा सुमारे 97 कोटी रुपयांचा पायलट प्रोजेक्ट सुरू झाला आहे.

निसर्गातील बदलामुळे कोकण किनारपट्टीला अलीकडे चक्रीवादळांचा मोठा तडाखा बसत आहे.कोकणात असलेल्या वृक्षराजीमुळे विद्युत वाहिनीच्या तारांवर झाडे पडून तारा तुटल्यामुळे कित्येक गावातील लोकांना अंधारात राहावे लागले होते. तौकते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीचे प्रचंड नुकसान झाले आहे.. त्यामुळे किनारपट्टीवरील गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने आखली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here