रत्नागिरी शेट्ये नगर येथे आज पहाटे गॅस सिलेंडरचा स्फोट; 2 महिला अद्याप ढिगाऱ्याखाली

0
73
रत्नागिरी शेट्ये नगर येथे आज पहाटे गॅस सिलेंडरचा स्फोट; 2 महिला अद्याप ढिगाऱ्याखाली

रत्नागिरी – रत्नागिरी शहरापासून काही अंतरावर असलेल्या शेट्ये नगर येथे आज पहाटे ५ वाजता गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात कुटुंबातील चार जण अडकले होते. त्यापैकी दोघांना बाहेर काढण्यात यश आले असून दोघे अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-हातात-टाळडोक्यावर-टोपी/

या स्फोटात दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेस्क्युसाठी पोलिस,शिरगांव सरपंच फरीदा रज्जाक काझी, सामाजिक कार्यकर्ते, रेस्क्यू टीम दाखल झाली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन महिलांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी क्रेन मशिन देखील दाखल झाल्या आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, स्फोट एवढा भीषण होता की, आजुबाजूच्या घरांवरही याचा परिमाण झाला आहे. या स्फोटामुळे शेजारच्या घरांच्या काचा उडून काहीजण जखमी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here