रशियाची स्पुटनिक-व्ही ही लस जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशभरात उपलब्ध

0
102

रशियाची स्पुटनिक-व्ही लस जूनपासून देशभरात उपलब्ध होणार आहे. स्पुटनिक-व्ही लस सुमारे १,१९५ रुपयांत मिळेल. लसीची किंमत ९९५ रुपये आहे आणि ती देण्यासाठी २०० रुपयांचा खर्च येईल.

अपोलो समूहाने जूनपासून दर आठवड्याला १० लाख डोस देऊ शकणार आहे असे सांगितले आहे. तर जुलैपासून वाढवून दुप्पट केले जातील असेही ते म्हणाले. येत्या सप्टेंबरपर्यंत दोन कोटी लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे असेही ते म्हणाले. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिननंतर भारतात मंजुरी मिळालेली स्पुटनिक-व्ही ही तिसरी लस आहे. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत देशात स्पुटनिकच्या ३.५ ते ४ कोटी डोसचे उत्पादन करण्याची तयारी सुरू आहे.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here