राजापुरात शेकडो शिवसैनिकांचा भाजपात जाहिर प्रवेश

0
89

राजापूर- तालुक्यातील प्रस्तावित रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेला सागवे, मिठगवाणे, कुंभवडे, अणसुरे, तारळ भागातील शिवसैनिकांनी दणका दिला आहे. शिवसेनेचे सागवेचे माजी विभागप्रमुख राजा काजवे, पंढरीनाथ आंबेरकर, सुहास कुवरे यांसह शेकडो शिवसैनिकांनी रविवारी भाजपामध्ये जाहिर प्रवेश करत शिवसेनेला दणका दिला आहे. विकासाची दुरदृष्टी शिवसेनेकडे नसल्याने आंम्ही तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपात प्रवेश करत असल्याचे यावेळी प्रवेशकर्त्या शिवसैनिकांनी सांगितले.
भाजपाचे प्रदेश चिटणीस, रत्नागिरी जिल्हा प्रभारी व माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत सर्व शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला.
विकास आणि रोजगारासाठी आंम्ही प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले असून शिवसेनेने त्याला विरोध केला. त्यामुळे शिवसेनेकडे विकासाचा दृष्टीकोन नसल्याने शिवसेनेला कंटाळून आंम्ही शिवसेनेचा त्याग करून भाजपात प्रवेश करत असल्याचे यावेळी शिवसेनेचे सागवेचे माजी विभाग प्रमुख राजा काजवे यांनी स्पष्ट केले. तर राज्याचे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे हेच हा रिफायनरी प्रकल्प मार्गी लावू शकतात अशी आमची खात्री असल्याने आंम्ही भाजपात प्रवेश करत असल्याचे पंढरीनाथ आंबेरकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here