राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात यावी अशी याचिका अॅड. अनुभा सहाय श्रीवास्तव यांनी दाखल केली होती. यापूर्वीच 12 वीच्या परीक्षा सहा राज्यांत घेण्यात आल्या होत्या. फक्त आंध्र प्रदेश राज्याचा निर्णय बाकी होता. त्यामुळे सर्व परीक्षा रद्द करून मूल्यांकनाची एकसमान योजना तयार करण्याबाबत आदेश जारी करावा अशी मागणी याचिकाकर्त्याने कोर्टाकडे केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना 31 जूलैपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच 10 दिवसांत अंर्तगत मूल्यांकन योजना तयार करण्यासदेखील सांगितले आहे.कोरोनासारख्या महामारीमुळे तज्ञ समितीसमवेत मूल्यांकनाचा एक आराखडा तयार करण्यात आला आहे. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा व विषय हे पूर्णतः वेगळे असतात .त्यामुळे दहावीच्या पाच विषयातील सर्वाधिक गुण आणि अकरावीच्या पाच विषयातील गुण असे मिळून 10 वी आणि 11 वीच्या गुणांना 30-30% आणि 12 वीच्या गुणांना 40% दिले जाणार आहे असे CBSC ने सांगितले आहे.म्हणजेच मागील 3 वर्षे दहावी, अकरावी आणि बारावीला आधार बनवत गुण दिले जाणार आहेत.