राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी संयुक्त कृती समितीची आज दुपारी 1.30 वाजता महत्त्वाची बैठक

0
110
एसटी कर्मचारी
एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी संयुक्त कृती समितीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे.मुंबई हायकोर्टाने निर्देश दिल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारला आणि त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. राज्य सरकारने जीआर काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतला नाही. त्यामुळे अखेर एसटी महामंडळानं कारवाई करत राज्य सरकारने संपावर गेलेले तब्बल 376 एसटी कर्मचाऱ्यांवर एकूण 45 डेपोमधल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. मुंबई हायकोर्टाचा अपमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे.

आज दुपारी 1.30 वाजता एसटी संयुक्त कृती समिती आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक होणार आहे. मुंबई सेंट्रल एसटी डेपो येथे ही बैठक होणार आहे.आजच्या बैठकीत तरी एसटी संपावर तोडगा निघणार का, या कडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने संप अधिक चिघळला आहे. या बैठकीत संपावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here