राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रुग्णालयात दाखल होणार

0
87

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रुग्णालयात दाखल होणार आहेत. उद्धव ठाकरे यांना मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी आज रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. 2 ते 3 दिवस रुग्णालयात राहणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.या काळात मुख्यमंत्र्यांवर एक छोटीशी शस्त्रक्रियाही होण्याची शक्यता आहे. पण याबाबत मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांनी काहीही सांगण्यास नकार दिला आहे.

गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकास कामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणले तरी थोडंसे दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here