राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठ्याचे योग्य नियोजन – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

0
88

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.अन्न व औषध प्रशासन ऑक्सिजन पुरवठ्याचे विवरणपत्र तयार करून ते उत्पादक व जिल्ह्यांना नियमितपणे देत असून दिनांक-२९.४.२०२१ साठी १६३६ टनाचे विवरणपत्र देण्यात आलेले आहे.

याप्रमाणे वितरण केल्या जाण्यासाठी प्रशासनाद्वारे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.महाराष्ट्र राज्यामध्ये मेडीकल ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या आयनॉक्स इंडिया, लींडे, एअर लिक्विड, टायो निप्पॉन, जे एस डब्ल्यू या पाच प्रमुख कंपन्या आहेत. याव्यतिरिक्त देखील अनेक छोटे उत्पादक आहेत त्यांचे देखील उत्पादन वाढले आहे या सर्व उत्पादकांचे मिळून सुमारे १२७० टन इतके ऑक्सिजन उत्पादन रोज होत आहे.केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी त्यांचे पत्र दि. २४ एप्रिल, २०२१ द्वारा १७८४ टन ऑक्सिजन कोटा महाराष्ट्रासाठी निश्चित केला आहे. त्यात राज्यातील व राज्याबाहेरील उत्पादकांचा समावेश आहे.

राज्यात सध्या प्रामुख्याने छत्तीसगड, कर्नाटका व गुजरात राज्यांमधून सुद्धा साधारणत: २०० ते २५० टन ऑक्सिजन दररोज प्राप्त होत आहे. विशाखापट्टणम येथून ७ टँकर घेऊन निघालेल्या विशेष रेल्वे व्दारा दि. २४ एप्रिल, २०२१ रोजी १०५ टन ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाला.राज्यात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी असलेल्या टँकरची कमतरता लक्षात घेता नायट्रोजनसाठी असलेल्या टँकर यांचे ऑक्सिजन टँकरमध्ये रूपांतर करणे सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत ६८० टन ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढली आहे आणि अजून ३५० ते ४०० टन वाहन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दि.- २७ एप्रिल, २०२१ रोजी राज्यात एकूण १५५६ टन ऑक्सिजनचे वितरण झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाद्वारे व शासनाद्वारा या कामी नेमलेल्या नोडल ऑफिसर्स द्वारा राज्यातील सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत.

42People Reached3EngagementsBoost Post

221 ShareLikeCommentShare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here