राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू करणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
117

राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल.

आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत याबाबत चर्चा केली.

राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमती दिली असून ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी, तर शहरांमध्ये 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू हाेतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दिली.नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे दर्शनासाठी आरोग्याचे नियम पाळून खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

कोरोनाचे सर्व नियम आणि अटी म्हणजेच मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हे नियम पाळण्याची जबाबदारी त्या त्या व्यवस्थापन समितीची असणार अाहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here