राज्यातील बारावीचा निकाल सीबीएसईप्रमाणे 30-30-40 फॉर्म्युल्यानुसार दिले जाणार गुण

0
98

शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाच्या संदर्भातील मूल्यमापन पद्धत जाहीर केली आहे. केली आहे. यानुसार सीबीएसई पॅटर्नचा वापर करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मूल्यमापन कार्यपद्धत जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे.

यानुसार इयत्ता दहावीच्या गुणांचे 30 टक्के वेटेज, इयत्ता अकरावीच्या गुणांचे 30 टक्के वेटेज आणि बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाचे 40 टक्के वेटेज यावरुन बारावीचा अंतिम निकाल दिला जाणार आहे. या फॉर्म्युलामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इयत्ता दहावी मधील बोर्डाच्या परीक्षेमध्ये सर्वात जास्त गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुणांवरुन मुल्यमापन केले जाईल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)च्या धर्तीवर राज्य सरकार आणि राज्य मंडळाने समन्वय समितीच्या माध्यमातून हा फॉर्म्युला तयार केला आहे. यासोबतच जे विद्यार्थी निकालाने असमाधानी असतील त्यांना कोविड 19 ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळावे यासाठी सर्व संबंधीत घटकांशी चर्चा करून मुल्यमापन प्रक्रिया शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here